भाजपच्या चिंचवड-किवळे मंडल अध्यक्षपदी योगेश चिंचवडे आणि सांगवी-किवळे मंडल अध्यक्षपदी विनोद तापकीर यांची निवड

चिंचवड, दि. १५ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी रविवारी (दि. १५) बैठक झाली. त्यामध्ये चिंचवड-किवळे मंडल अध्यक्षपदी योगेश चिंचवडे आणि सांगवी-काळेवाडी मंडल अध्यक्षपदी विनोद तापकीर यांची बिनविरोध निवड झाली.

माजी जलसंधारणंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली थेरगावमध्ये ही बैठक झाली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सचिन पटवर्धन, अमित गोरखे, शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, उमा खापरे, नगरसेविका झामाबाई बारणे, राजेश पिल्ले, प्रमोद निसळ, काळूराम बारणे, प्रमोद ताम्हणकर, राजू दुर्गे आदी उपस्थित होते.

या बैठकीत शहरातील सहापैकी चिंचवड विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या चिंचवड-किंवळे आणि सांगवी-काळेवाडी या दोन मंडलांच्या संघटनात्मक निवडणुका घेण्यात आल्या. नगरसेवक अॅड. मोरेश्वर शेडगे यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. या निवडणुकीत चिंचवड-किवळे मंडल अध्यक्षपदी योगेश चिंचवडे आणि सांगवी-काळेवाडी मंडल अध्यक्षपदी विनोद तापकीर यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीनंतर माजी मंत्री प्रा. राम शिंदे आणि भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी योगेश चिंचवडे व विनोद तापकीर यांचे अभिनंदन केले.

Share this to: