जाड असल्याने सुनेला एकच वेळ जेवण : छळाला कंटाळून जीवनयात्रा संपविली

पिंपरी : माहेराहून हुंडा आणण्यासाठी तसेच इतर कारणांवरून विवाहितेचा छळ होत असल्याच्या घटना अनेकदा ऐकायला मिळतात. पण शारीरिक जाड असल्याच्या कारणावरून एकच वेळ जेवण देऊन सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ झाल्याचा प्रकार भोसरीत उघडकीस आला आहे. या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपविली.

जाड असल्याने सुनेला एकच वेळ जेवण : छळाला कंटाळून जीवनयात्रा संपविली
जाड असल्याने सुनेला एकच वेळ जेवण : छळाला कंटाळून जीवनयात्रा संपविली


साखरपुड्यात तसेच लग्नावेळी मुलगी पाहताना सासरच्या मंडळीकडून कोणतीही तक्रार नव्हती. मात्र, लग्नानंतर विवाहित महिला जाड असल्याच्या कारणावरून सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला. सतत टोमणे देत एक वेळचेच जेवण दिले. या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. प्रियंका केदार पेटकर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
भोसरी येथे राहणाऱ्या प्रियंका यांचा २० डिसेंबर २०१५ ला फलटण येथील केदार श्रीकांत पेटकर याच्याशी विवाह झाला. तीन महिने आधी साखरपुडा झाला होता. पेटकर यांच्या कुटुंबातील सर्वांनी प्रियंकाला पाहिले होते. विवाहापर्यंतच्या तीन महिन्यांच्या कालावधीतही दोन्ही कुटुंब संपर्कात होते. दरम्यान, २० डिसेंबर २०१५ ला प्रियंका आणि केदार यांचा विवाह झाल्यानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी प्रियंका यांचा छळ करण्यास सुरुवात केली.
‘तू जाड आहेस, तब्येत कमी कर’ असे म्हणू लागले. तब्येत कमी करण्याचे कारण देत प्रियंका यांना एक वेळचेच जेवण दिले जायचे.
……
घटस्फोटासाठी आणला दबाव
प्रियंका यांनी घटस्फोट द्यावा, यासाठीही त्यांच्यावर दबाव आणला जात होता. शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून रविवारी दुपारी दीडच्या सुमारास प्रियंका यांनी भोसरीतील गव्हाणे वस्ती येथील घरी पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करीत जीवनयात्रा संपवली. घटनेत विवाहितेला दोष देत तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याने तिच्यावर जीव गमाविण्याची वेळ आल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.
……..
तिची सासरी नांदायची इच्छा होती
माझी बहीण केवळ जाड असल्याच्या कारणावरून तिचा सासरच्या मंडळींकडून वारंवार छळ केला जात होता. सासरचे मंडळी तिला वारंवार टोमणे देत. तसेच तिला सासरी नांदायची इच्छा असतानाही तिच्यावर घटस्फोट देण्यासाठी दबाव आणला जायचा, असे प्रियंका यांचे भाऊ पुष्कराज प्रभुणे यांनी सांगितले.

Share this to:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *