अबब…प्रियांका चोप्रा-निक जोनसचे नवे घर १४४ कोटींचे!

लॉस एंजलिस, दि. १५ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – निक जोनस आणि प्रियांका चोप्रा ही जोडी बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्येही कायम चर्चेत असते. निक आणि प्रियांका पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत… कारण या दोघांनी मिळून नवं घर घेतल्याची बातमी आहे. त्यांच्या या घराची किंमत साधारण १४४कोटी रुपये इतकी आहे.

प्रियांका आणि निक यांनी याआधी त्यांनी बेवर्ली हिल्स भागात घर घेतलं होतं. पण हे घर घर विकल्याची चर्चा होती. त्यांनतर हाती आलेल्या माहितीनुसार या दोघांनी लॉस एंजलिसमधील सॅन फनांडो व्हॅलीमध्ये नवा मॅन्शन घेतला आहे. त्यांच्या या नव्या घराची किंमत २० मिलियन डॉलर्स म्हणजे साधारण १४४ कोटी रुपये सांगितले जात आहे.

देसी गर्ल प्रियांका आणि निक यांचं हे घर २० हजार स्क्वेअर फुटांचं असून,७ बेडरूम आहेत. घरामध्ये स्वीमिंग पूलही आहे. फनांडो व्हॅलीचं सुंदर दृश्य या घरातून दिसतं. याशिवाय घरामध्ये बॉलिंग ऑले, थिएटर, बास्केटबॉल कोर्ट, लाउंज एरिया,जिम आदी सुविधाही आहेत. या घराजवळ निकचा थोरला भाऊ जो जोन्सचं घर आहे.

प्रियांका चोप्रा कामासाठी जरी भारतात येत असली तरी परदेशात ती चांगली रूळली आहे. तिच्या सासरच्या मंडळींसोबत आनंदाचे क्षण घालवताना प्रियांका बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच तिनं सासरच्या लोकांसोबत साजरा केलेल्या पहिल्या दिवाळीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते. ‘निकयांका’चं लग्न मागील वर्षी डिसेंबरमध्ये झालं होतं. दोघंही वेगवेगळ्या संस्कृतीत वाढले असले तरी ते एकमेकांचे सण आवर्जून साजरे करतात. काही दिवसांपूर्वीच प्रियांकाने आपली करवाचौथ साजरी केली होती. त्यावेळी निकही खूप उत्साहात दिसत होता. दिवाळसणाच्या निमित्ताने प्रियांकाचा एथनिक अवतार दिसला. गोल्डन फ्लोरल साडीत ती खूप सुंदर दिसत होती.

Share this to: