चिखली, नेवाळेवस्ती येथील एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून ११ लाख लंपास

भोसरी, दि. ११ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – चिखली, नेवाळेवस्ती येथील अॅक्सिक बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून चोरट्यांनी तब्बल ११ लाख रुपये लंपास केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे.

या एटीएममध्ये शुक्रवारीच बँकेडून लाखो रुपायांची रोकड भरण्यात आली होती. चोरट्यांनी शनिवारी कटरच्या सहाय्याने हे एटीएम फोडून त्यातील ११ लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. ही घटना सोमवारी दुपारी बँक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली.

दरम्यान, बँकेने शुक्रवारी याच एटीएममध्ये काही लाख रुपयांची रोकड भरली होती. तेव्हाच चोरट्यांनी पाळत ठेवून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एटीएम फोडून त्यातील रोकड लंपास केली असावी, असा चिखली पोलिसांचा संशय आहे. चिखली पोलिस तपास करत आहेत.

Share this to: