दिवंगत अंकुशराव लांडगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भोसरीत गुरूवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

भोसरी, दि. ६ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे माजी अध्यक्ष कै. अंकुशराव लांडगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरूवारी (दि. ६) भोसरीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठान आणि रवीभाऊ लांडगे मित्र परिवाराने या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गुरूवारी सकाळी दहा वाजता पांजरपोळ अंध शाळेत फळ वाटप केले जाणार आहे. तसेच भोसरी, अंकुशनगर येथील बाबा आनंद मंगल कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे याच मंगल कार्यालयात रात्री साडे आठ वाजता हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन होणार आहे. स्वर्गीय अंकुशराव लांडगे हे पिंपरी-चिंचवड शहरातील अनेकांचे आधारस्तंभ होते. त्यांनी शहरात भाजप वाढविण्यासाठी दैदिप्यमान कार्य केले. तसेच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी मोठे कार्य केले. पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे नगरसेवक रवि लांडगे यांनी सांगितले.

Share this to: