भाजप नगरसेवक व भाजयुमोचे शहराध्यक्ष रवि लांडगे यांनी बजावला मतदानाचा हक्क…तुम्ही केले का मतदान?..

भोसरी, दि. २१ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष व नगरसेवक रवि लांडगे यांनी सोमवारी (दि. २१) मतदानाचा हक्का बजावला. सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन लांडगे यांनी मतदानानंतर केले.

भोसरी विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. संपूर्ण मतदारसंघात उत्साहात मतदान सुरू आहे. पावसाने उघडीप दिल्याने नागरिकांचा मतदानाचा प्रतिसाद मिळत आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ६ मधून बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक तसेच भाजयुमोचे शहराध्यक्ष रवि लांडगे यांनी सकाळी मतदान केले.

भोसरी, धावडेवस्ती येथील भैरवनाथ विद्यालयातील मतदान केंद्रावर रवि लांडगे यांनी मतदानाचा हक्का बजावला. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. सर्व नागरिकांनी हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे. मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन रवि लांडगे यांनी मतदानानंतर केले.

Share this to: