आमदार लक्ष्मण जगताप यांना पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनांचा जाहीर पाठिंबा

चिंचवड, दि. १९ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार लक्ष्मण जगताप यांना पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे.

संघटनेने मेळावा घेऊन आमदार जगताप यांना निवडणुकीत पाठिंबा जाहीर केला. गेल्या पाच वर्षांत आमदार जगताप यांनी लघु उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी वीजपुरवठा सुरळित करणे, एमआयडीसी व समाविष्ट गावांमधील औद्योगिक परिसरात पायाभूत सुविधांची पुर्ता करणे, औद्योक्षिक क्षेत्रात शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करणे, केंद्र व राज्य सरकार, महापालिका, प्राधिकरण तसेच एमआयडीसीकडे लघु उद्योजकांचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्याचे काम आमदार जगताप यांनी सातत्याने केले आहे. त्यामुळे त्यांना निवडणुकीत संघटना पाठिंबा देत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे यांनी सांगितले.

यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू विजय जगताप, संघटनेचे सचिव जयंत कड, खजिनदार संजय ववले, उद्योजक कार्तिक लांडगे यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Share this to: