चिंचवड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना लोहार समाज संघटनेचा पाठिंबा

चिंचवड, दि. १८ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवेसना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना पिंपरी-चिंचवड शहर लोहार समाज संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. आमदार जगताप यांचे विकासाचे नेतृत्व असल्यामुळे समाजाने निवडणुकीत त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती संघटनेच्या शिवाजी कळसे यांनी दिली.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार जगताप यांचे बंधू विजय जगताप यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी शिवाजी कळसे, बाळासाहेब शेलार, अशोक नवगण, माणिक चव्हाण, कुंडलिक वसव, महेश कंगणे-सुतार, रमाकांत कळसे, सागर लोहार, दिपक टिंगरे, मारूती लोहार, अजित लोहार, आण्णा लोहार, नागेश लोहार, पद्मसिंग पाटमास, संदिप हरिहर आणि गौरव लोहार हे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवाजी कळसे म्हणाले, “आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड मतदारसंघात विकासाचे राजकारण केले आहे. त्यांनी अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास केला आहे. त्यांनी राबविलेल्या विकासकामांचा नागरिकांना फायदा झाला आहे. त्यामुळे संघटनेने निवडणुकीत आमदार जगताप यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार जगताप यांना भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी लोहारसमाज संघटना कटिबद्ध असल्याचे कळसे यांनी सांगितले.”

Share this to: