चिंचवड, भोसरी, पिंपरी विधानसभा मतदारसंघात विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल – आमदार लक्ष्मण जगताप

चिंचवड, दि. १० (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या तीनही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मताधिक्याने निवडून येतील. विरोधकांचे डिपॉझीट जप्त होईल, असा विश्वास चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी बुधवारी (दि. ) व्यक्त केला.

भाजप, शिवसेनेसह महायुतीतील इतर घटक पक्षांची आकुर्डी येथे संयुक्त बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार जगताप बोलत होते. यावेळी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, खादी व ग्रामोद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. हेमंत तापकीर, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, भाजप प्रदेश सदस्य उमा खापरे, राजेश पिल्ले, महेश कुलकर्णी, शहर प्रवक्ते व सरचिटणीस अमोल थोरात, महिला आघाडी शहराध्यक्षा शैला मोळक आदी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, “भाजपने पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. त्याच प्रमाणे शहराचा आणखी विकास व्हावा याचे नियोजन करून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. शहरातील जनता विकासकामे करणाऱ्यांनाच पसंती देणार आहे. त्यामुळे तिनही विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”

Share this to: