तुझ्या बापाला तुरुंगात घातल्याशिवाय गप्प बसणार नाही; प्रणिती शिंदेंना धमकी

सोलापूर, दि. ९ ( पिंपरी चिंचवड टाइम्स ) – महाराष्ट्रात माझ्या  इतके गु्न्हे कोणाच्या  नावांवर आहेत, ते  दाखवा. तुमच्यावर ५  केस पडल्या तर लटपटायला लागता. तुझ्या बापाला तुरुंगात घातल्याशिवाय गप्प बसणार नाही, जो माणूस पंतप्रधानांना येथे आणू शकतो,  तो काहीही करु शकतो, अशी धमकीच माकपचे सोलापूर मध्य मतदारसंघातील उमेदवार नरसय्या आडाम यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना दिली आहे.

आडाम म्हणाले की,  सर्वांची संपत्ती वाढली मात्र माझ्यावर १७५ गुन्हे वाढले.  २०० केसेस झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. मी चोरी, डाका, फसवणूक या केसेस नाही तर परवानगी नसताना सभा घेणे, मोर्चे काढले, सत्याग्रह केला, धरणे आंदोलन केले, रस्ता रोको केला याचे गुन्हे आहेत.  हे गुन्हे माझ्यासाठी अलंकार आहेत.

दरम्यान,  प्रणिती शिंदे आणि माकपचे नरसय्या आडम यांच्यात चुरशीची लढत होत आहे. सोलापूर मध्य मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या जुबेर बागवान यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरीचे निशाणा फडकावले होते.  परंतु  पक्षत्रश्रेष्ठींच्या सुचनेनंतर त्यांनी आपली बंडाची तलवार म्यान केली आहे.

Share this to: