आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ गुरूवारी मुख्यमंत्र्यांची रहाटणीत कापसे लॉन्समध्ये सभा

पिंपरी, दि. ९ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम संघटना आणि रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरूवारी (दि. १० ) रहाटणीत सभा होणार आहे.

रहाटणीतील कापसे लॉन्स येथे सायंकाळी सहा वाजता या सभेला सुरूवात होईल. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे तसेच राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम संघटना आणि रयत क्रांती संघटनेचे शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.  

भारतीय जनता पार्टीने पिंपरी-चिंचवड शहरात अनेक मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देऊन विकासाला गती दिली आहे. तसेच महापालिकेच्या माध्यमातून चिंचवड विधानसभा मतदारसंघात विकासाचा डोंगर उभा राहिला आहे. या सर्व विकासकामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शहराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहेत. त्यांची रहाटणी येथे गुरूवारी सभा होत आहे. या सभेला मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे.

Share this to: