उदयनराजे यांच्या संपत्तीत अवघ्या पाच महिन्यांत दीड कोटींची वाढ

मुंबई, दि. ९ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात दाखल झालेले आणि सातारा लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीत अवघ्या पाच महन्यांमध्ये दीड कोटी रुपयांची भर पडली आहे. भोसले राजघराण्याकडे सोने आणि हिऱ्यांचे ४० किलोंचे दागिने आहेत. सातारा पोटनिवडणुकीत उदयनराजे आणि माजी राज्यपाल राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्यात लढत होत आहे.

उदयनराजे भोसले यांनी सादर केलेल्या शपथपत्रातून संपत्तीचा तपशील समोर आला आहे. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे सातारा लोकसक्षा मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे.

लोकसभा निवणुकीत उदयनराजे भोसले यांच्याकडे १३ कोटी ८१ लाखांची जंगम मालमत्ता होती. आता तित वाढ होऊन ती १४ कोटी ४४ लाखांपेक्षाही अधिक झाली आहे. उदयनराजेंकडे सोने आणि हिऱ्याचे दागिने. शिरटोप असे सुमारे ४० किलोचे दागिने आहेत. तसेच त्यांच्याकडे ऑडी, मर्सिडीज बेन्झ. इण्डेवर अशा कार आहेत. या बरोबरच त्यांच्याकडे १८५ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. यात जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश आहे. सुखवस्तू हा आपला व्यवसाय असल्याचे उदयनराजेंनी शपथपत्रात नमूद केले आहे. उदयनराजेंवर १ कोटी ८२ लाखांचे वाहन कर्ज देखील आहे.

उदयनराजे यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्याकडे १० कोटींची जंगम, तर ११ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. श्रीनिवास पाटील यांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. श्रीनिवास पाटील यांच्या कुटुंबाकडे दागदागिने आहेत. तसेच कुटुंबाच्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूका आणि काही बँकांमध्ये ठेवीही आहेत. या बरोबरच मुंबईतील आदर्श गृहनिर्माण सोसायटीला ६० लाख रुपयांचे त्यांनी कर्ज दिल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

विधासभा निवडणुकीसोबतच पोटनिवडणूक

उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यामुळं रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात विधानसभेसोबतच २१ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगानं ही घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं इथं जोरदार मोर्चेबांधणी केली. सुरुवातीला उदयनराजे यांच्याविरोधात खुद्द शरद पवार निवडणूक लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर उदयनराजे भावुक झाले होते. शरद पवार आपल्या विरोधात उभे राहिल्यास आपण निवडणुकीतून माघार घेऊ असे उदयनराजेंनी म्हटले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी घोषित केली आहे.

Share this to: