धम्मचक्र परिवर्तन दिन; भोसरी मतदारसंघातील बुद्ध विहारांमध्ये जाऊन विलास लांडे यांनी दिल्या शुभेच्छा

भोसरी, दि. ८ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – भोसरी विधानसभा मतदारसंघात बहुजनांचा उमेदवार म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर आधारित समाजकारण करत आहे. दुसऱ्याप्रमाणे स्वतःचे घर भरण्यासाठी नव्हे; तर बहुजनांनी घरे उभारण्यासाठी मी ही निवडणूक लढवित आहे, असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार व माजी आमदार विलास लांडे यांनी मंगळवारी (दि. ८) केले.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त मंगळवारी (दि. ८) मतदारसंघातील विविध ठिकाणच्या बुद्ध विहारांना भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच तथागत गौतम बुद्ध आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. इंद्रायणीनगर येथील धम्मनिनाद बुद्ध विहारात अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष भाऊसाहेब डोळस, सुरेश कसबे, गोकुळ गायकवाड, नगरसेवक संजय वाबळे, माजी नगरसेवक विनायक रणसुभे, संतोष मोरे, मुरलीधर घनवीर, विजय भालेराव, नामदेव वाळके, अनिकेत पडाळे, गिरीष वाघमारे, पोपट भालेराव, दिलीप काटे, महादेव बावीसकर, सुनील कांबळे, भाऊ चाबुकस्वार, सुरेश कसबे, गोकुळ गायकवाड तसेच उपासक व उपासिका उपस्थित होते.

विलास लांडे म्हणाले, “माझ्या सामाजिक व राजकीय जीवनात काम करत असताना अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांना सोबत घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले आहेत. विधानसभा निवडणुकीत मी बहुजनांचा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. मी कधीही कुणाचे घर उद्‌ध्वस्त करण्याचे काम केलेले नाही. मी बहुजनांची घरे कशी उभी राहतील, यासाठीच प्रयत्न केले आहेत. इतरांनी बहुजनांची घरे लुटण्याची कामे केली आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदारसंघातील बहुजनांनी सारासार विचार करून मला भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन लांडे यांनी केले.”

दरम्यान, विलास लांडे यांनी धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त मंगळवारी सकाळी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर भोसरी विधानसभा मतदारसंघातील अंकुर बुद्ध विहार, शाहूनगर येथील बुद्ध विहार, इंद्रायणीनगर येथील धम्मनिनाद बुद्ध विहार, मासुळकर कॉलनी येथील सिद्धार्थ सेवा संघ व इतर ठिकाणच्या बुद्ध विहारांना भेटी देऊन धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच तथागत गौतम बुद्ध आणि घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्याचप्रमाणे भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध मंदिरांना भेटी देऊन विलास लांडे यांनी दर्शन घेतले. तसेच नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

Share this to: