पिंपरी मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात १८ उमेदवार; अण्णा बनसोडे आणि गौतम चाबुकस्वार यांच्यात प्रमुख लढत

पिंपरी, दि. ७ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – विधानसभा निवडणुकीच्या अर्ज माघारीनंतर पिंपरी विधानसभा मतदारसंघात एकूण १८ उमेदवार रिंगणात उरले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे आणि शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पिंपरी मतदारसंघात या दोघांमध्येच प्रमुख लढत रंगणार आहे.

हे आहेत ते १८ उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा दादू बनसोडे (चिन्ह – घड्याळ), शिवसेनेचे अॅड. चाबुकस्वार गौतम सुखदेव (चिन्ह – धनुष्यबाण), बहुजन समाज पार्टीचे धनराज गोविंद गायकवाड (चिन्ह – हत्ती), बहुजन मुक्ती पार्टीचे गोविंद गंगाराम हेरोडे (चिन्ह – खाट), वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण ऊर्फ बाळासाहेब गायकवाड (चिन्ह – सिलेंडर), भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीचे संदिप कांबळे ऊर्फ गुरूजी (चिन्ह – ब्रेड), अपक्ष अजय चंद्रकात गायकवाड (चिन्ह – हिरा), अपक्ष अजय हनुमंत लोंढे (चिन्ह – शिट्टी), अपक्ष ओव्हाळ मुकुंदा आनंदा (चिन्ह – फुटबॉल), अपक्ष चंद्रकांत अंबादास माने (चिन्ह – पेनाची नीब), अपक्ष दिपक दगडू जगताप (चिन्ह – शिवण यंत्र), अपक्ष दिपक महादेव ताटे (चिन्ह – रोड रोलर), अपक्ष नरेश सूरज लोट (चिन्ह – सफरचंद), अपक्ष बाळासाहेब नामदेव ओव्हाळ (चिन्ह – अंगठी), अपक्ष मिनाताई यादव खिलारे (चिन्ह – प्रेशर कुकर), अपक्ष युवराज भगवान दाखले (चिन्ह – ऑटो रिक्शा), अपक्ष डॉ. राजेश नागोसे (चिन्ह – कोट), अपक्ष हेमंत अर्जुन मोरे (चिन्ह – कपबशी).

Share this to: