भोसरी मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात १२ उमेदवार; महेश लांडगे आणि विलास लांडे यांच्यात प्रमुख लढत

भोसरी, दि. ७ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – विधानसभा निवडणुकीच्या अर्ज माघारीनंतर भोसरी विधानसभा मतदारसंघात एकूण १२ उमेदवार रिंगणात उरले आहेत. त्यामध्ये भाजपचे उमेदवार महेश लांडगे आणि अपक्ष लढणारे माजी आमदार विलास लांडे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. चिंचवड मतदारसंघात या दोघांमध्येच प्रमुख लढत रंगणार आहे.

हे आहेत ते १२ उमेदवार

बहजुन समाज पार्टीचे पवार राजेंद्र आत्माराम (चिन्ह – हत्ती), भारतीय जनता पार्टीचे महेश किसन लांडगे (चिन्ह – कमळ), जनहित लोकशाही पार्टीचे गरजमल विश्वास भगवान (चिन्ह – ऑटो रिक्शा), समाजवादी पार्टीच्या वहिदा शहेनु शेख (चिन्ह – सायकल), बहुजन मुक्ती पार्टीचे विजय लक्ष्मण आराख (चिन्ह – खाट), वंचित बहुजन आघाडीचे शहानवाज शेख (चिन्ह – गॅस सिलेंडर), अपक्ष छाया संजय जगदाळे-सोळंके (चिन्ह – शिट्टी), अपक्ष डोळस हरेश बाजीराव (चिन्ह – चावी) आणि अपक्ष भाऊसाहेब रामचंद्र अडागळे (चिन्ह – शिवण यंत्र) हे भोसरीच्या मैदानात आपले नशीब आजमावणार आहेत.

Share this to: