चिंचवड मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात ११ उमेदवार; लक्ष्मण जगताप आणि राहुल कलाटे यांच्यात प्रमुख लढत

पिंपरी, दि. ७ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – विधानसभा निवडणुकीच्या अर्ज माघारीनंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण ११ उमेदवार रिंगणात उरले आहेत. त्यामध्ये भाजप शहराध्यक्ष, विद्यमान आमदार व भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप आणि अपक्ष लढणारे शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांचा समावेश आहे. चिंचवड मतदारसंघात या दोघांमध्येच प्रमुख लढत रंगणार आहे.

हे आहेत ते ११ उमेदवार

चिंचवड मतदारसंघात जगताप लक्ष्मण पांडुरंग (चिन्ह- कमळ), राजेंद्र माणिक लोंढे (चिन्ह – हत्ती), एकनाथ नामदेव जगताप (चिन्ह – खाट), छायावती चंद्रकांत दिसले (चिन्ह – हातगाडी), नितीश दगडु लोखंडे (चिन्ह – ऑटो रिक्षा), महावीर ऊर्फ अजित प्रकाश संचेती (चिन्ह – शिट्टी), कलाटे राहुल तानाजी (चिन्ह – बॅट), डॉ. मिलिंदराजे दिगंबर भोसले (चिन्ह – हेलिकॉप्टर), रविंद्र विनायक पारधे (चिन्ह – कपबशी), राजेंद्र मारूती काटे (चिन्ह – नारळाची बाग), सूरज अशोकराव खंडारे (चिन्ह – संगणक) हे ११ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.

Share this to: