सांगवीतील बाबुरावजी घोलप विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात; कतृत्ववान विद्यार्थ्यांचा गौरव

चिंचवड, दि. ६ (पिंपरी चिंचवड टाइम्स) –  सामाजिक कार्य करताना अनेक अडचणी येतात. तसेच अपयशही येते. अशा वेळी नकारात्मकता वाढते. मात्र निराश न होता अपयशाला सामोरे गेल्यास यशाला निश्चितपणे गवसणी घालता येते, असे मत माजी नगरसेवक व उद्योजक शंकर जगताप यांनी व्यक्त केले.

महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सांगवीतील (पुर्वश्रमीचे महाराष्ट्र विद्यालय) बाबुराव घोलप उच्च व माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा व स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी हे प्रमुख पाहुणे होते. यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव आत्माराम जाधव, मुख्यध्यापिका सरिता सूर्यवंशी, अंतरराष्ट्रीय कब्बडी पंच दत्तात्रय झिंजुर्डे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविक आरती चोंधे, माया बारणे, माजी नगरसेविका वैशाली जवळकर, पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, रुपाली माळी, जयनाथ काटे, विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब राक्षे, सेक्रेटरी विजय नवले, उपाध्यक्ष रामदास कस्पटे, खजिनदार अविनाश जाधव, महादेव भुजबळ, विवेक नांदगुडे, प्रवीण जगताप, अमोल कामठे, पुष्पा निंबाळकर, आशा चव्हाण यांच्यासह महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

या मेळाव्यात दिवंगत सुरेश चोंधे पाटील यांच्या स्मरणार्थ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी विलास वाळके, कृष्णकांत ढोणे, हभप वसंत कलाटे, प्रकाश बालवडकर, राष्ट्रीय खेळाडू शंकर काटे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. शंकर जांभूळकर, क्रीडारत्न पैलवान विजय नखाते, शैक्षणिक हभप. जगन्नाथ काटे, विष्णू तांबे, रोहिदास पवार, कायदेतज्ञ पांडुरंग थोरात, वैद्यकीय डॉ. दिनेश गाडेकर, कामगारनेते महेंद्र बालवडकर, उद्योजक संजय भिसे, सामाजिक अंकुश जवळकर, सहकार संतोष बारणे, संतोष ढोरे, कृषीरत्न पांडुरंग जमदाडे, अशोक मुरकुटे यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तसेच यशस्वी माजी विद्यार्थी, विद्यार्थ्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या मेळाव्यात महाविद्यालाच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील अने आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालिंदर राऊत यांनी केले. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आभार मानले. 

Share this to: