पिंपरीगावातील शिवाजी कोंढाळकर यांचे निधन

पिंपरी, दि. ६ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे निवृत्त प्रशासन अधिकारी व पिंपरीगावाचे ज्येष्ठ नागरिक शिवाजी बाबूराव कोंढाळकर (वय 73) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची पतसंस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. महापालिकेतील मीटर निरीक्षक मंगेश कोंढाळकर यांचे ते वडील होत.

Share this to: