विधानसभा निवडणूक २०१९; तब्बल ७९८ उमेदवारांचे अर्ज बाद

मुंबई, दि. ६ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – येत्या २१ ऑक्टोबर रोजी राज्यातील उमेदवारांचे राजकीय भविष्य ठरणार आहे. विधानसभेवर जाण्यासाठी अनेक इच्छुक आणि विद्यमान आमदार मोर्चेबांधणी करत असतात. पण एखादी चूक त्यांना निवडणूक लढवण्यापासून दूर ठेवते. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल ५ हजार ५४३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु त्यापैकी ४ हजार ७३९ उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत.

उमेदवारी अर्ज भारण्यात आलेल्या काही चुकांमुळे तब्बल ७९८ अर्ज बाद करण्यात आले. त्यामुळे या उमेदवारांच्या विधानसभा वारीला ग्रहण लागलं आहे. राज्यात भरण्यात आलेल्या उमेदवारी अर्जापैकी ४ हजार ७३९ उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात आपलं नशीब आजमावणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली. त्यानंतर काही त्रुटी आढलेले अर्ज बाद करण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

Share this to: