आत्महत्या करण्याशिवाय हे लोक तुमच्यापुढं पर्याय ठेवत नाहीत; अभिनेता किरण मानेची पोस्ट व्हायरल

मुंबई, दि.१४ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – सोशल मीडियावर रोखठोक मत मांडणारा अभिनेता किरण माने नेहमीच चर्चेत असतो. सामाजिक मुद्द्यांवर बोलणाऱ्या किरण माने याची नुकतीच शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यानं मराठी कलाक्षेत्रावर भाष्य केलं आहे.

‘मराठी कलाप्रांताचा गळा ठरावीक बुरसटलेल्या विचारधारेच्या गटानं आपल्या जबरदस्त पकडीत दाबून धरलाय. तुम्ही प्रतिभावान असाल,मेहनती असाल,आपलं काम खणखणीत वाजवत असाल… पण तुम्ही त्यांच्या ‘गटात’ न बसणारे , त्यांची विचारधारा न मानणारे असाल तर तुम्हाला मराठीत भयानक आणि जीवघेण्या संघर्षातून पुढे जाण्याशिवाय तरणोपाय नाही ! हो, तुम्ही कलावंत म्हणून सुमार दर्जाचे असाल, तर मात्र तुम्ही ‘सुरक्षित’ आहात. त्यांना शेजारी उभी करायला अशी बुजगावणी लागतातच.

पण अस्सल प्रतिभावंतांनो, तुम्ही जीव ओतून प्रामाणिकपणे चांगलं काम करा… रोज ‘मरण’ अनुभवत पुढं जात रहाणं, नाहीतर सरळ हे क्षेत्र सोडून आपला कामधंदा सांभाळणं किंवा आत्महत्या करणं या तीन गोष्टींशिवाय हे लोक तुमच्यापुढं पर्याय ठेवत नाहीत’, अशी पोस्ट किरण मानेनं शेअर केली आहे.

https://www.facebook.com/kiran.mane.9047/posts/10223077417791428
Share this to: