लोणावळा व्ही. पी. एस. हायस्कूल व द. पु. मेहता ज्यु. कॉलेजची विद्यार्थीनी गौरी गायकवाडचा लोणावळा पोस्ट ऑफीसतर्फे सत्कार

लोणावळा, दि.१३ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – लोणावळा व्ही.पी. एस. हायस्कूल व द. पु. मेहता ज्यु. कॉलेजची विद्यार्थीनी गौरी विशाल गायकवाड हिचा लोणावळा पोस्ट ऑफीसतर्फे सत्कार करण्यात आला.

गौरी गायकवाड हि विद्यार्थीनी रिपब्लकन पार्टी ऑफ इंडिया (ए) मावळ तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांची नात आहे.

पोस्ट ऑफीस लोणावळा तर्फे प्रत्येक शाळेमध्ये फॉर्म दिले होते. त्यामध्ये सुवर्ण महोत्सवी भारत देश कसा असावा? त्या बद्दल स्वतःचे विचार लिहून पाठविले त्या मध्ये संपूर्ण भारतामधून पाठविलेले ७५ लाख पोस्ट कार्डमधून तिचे पत्र प्रथम निवडले गेले. त्याबद्दल पोस्ट ऑफीस लोणावळा व व्ही. पी. एस. हायस्कूल द. पू. मेहता ज्यु. कॉलेज लोणावळातर्फे सत्कार करण्यात आला.

Share this to: