पंतप्रधानांना जीवे मारण्याच्या रचलेल्या कटामागे काँग्रेस हाय कमांडसह पंजाबचे मुख्यमंत्री सहभागी

नवी दिल्ली, दि.१३ (पिंपरी चिंचवड टाइम्स)  – फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफ्यात अचानक झालेल्या घडामोडींनंतर मोदींचे पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.

यानंतर पंजाबमध्ये भाजप आणि काँग्रेस विरुद्ध वातावरण तापले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी काँग्रेस हाय कमांड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. काँग्रेस हाय कमांड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊ पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे.

शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना तत्काळ अटक करावी. पंतप्रधानांची हत्या करण्याच्या रचलेल्या कटामध्ये चन्नी यांचा सहभाग आहे. त्यामुळे त्याच्यावर तत्काळ कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी. या घटनेतील पुरावे पाहिले तर सर्व पुरावे हेच दर्शवत आहेत की काँग्रेस हाय कमांड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याचा कट रचला होता.

यावेळी शर्मा यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेमधील गोंधळाच्या प्रकरणानंतर केलेल्या स्टींग ऑप्रेशनचाही संदर्भ दिला. पंतप्रधानांना जीवे मारणार असल्याची माहिती पंजाबमधील पोलिसांना दोन जानेवारी रोजीच मिळाली होती. या सर्व प्रकरणानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी ज्यापद्धतीची वक्तव्य केली त्यावरुन त्यांना या कटाचा अंदाज होता, असा धक्कादायक खुलासाही यावेळी शर्मा यांनी केला.

Share this to: