पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या २४ तासात ‘कोरोना’चे १२०० पेक्षा अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी, दि.१० (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

गेल्या २४ तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे १२७६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. शहरात रुग्ण वाढत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या साडेसहा हजाराच्या वर गेल्याने चिंता वाढली आहे.

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर १० हजार ३६४ संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १२७६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २ लाख ८६ हजार २१३ इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये २३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत २ लाख ७५ हजार ७२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

शहरामध्ये सध्या ६६९४ ॲक्टिव्ह रुग्ण  आहेत. यामध्ये ४२५ संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर ६२६९ होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील ४,५२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Share this to: