वाकडमधील नोकरी महोत्सवात ९१५ जणांच्या मुलाखती, ३४८ जणांना जागेवरच मिळाली नोकरी, २७८ जणांची ट्रेनिंगसाठी निवड; माजी नगरसेवक शंकर जगतापांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन

चिंचवड, दि. ४ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप नगरसेवक संदिप कस्पटे यांनी प्रभाग क्र. २५ व २६, वाकड-पिंपळेनिलखमधील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या अटल नोकरी महोत्सव व मार्गदर्शन मेळाव्याचे उद्घाटन माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या नोकरी महोत्सवात ९१५ बेरोजगारांनी मुलाखती दिल्या. त्यातील ३४८ जणांना जागेवरच नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच २७८ जणांची ट्रेनिंगसाठी निवड झाली.

वाकड, कस्पटेवस्ती येथील महापालिकेच्या शाळेत हा नोकरी महोत्सव व मार्गदर्शन मेळावा झाला. यावेळी नगरसेविका आरती चोंधे, भारती विनोदे, कुणाल वाव्हळकर, संकेत चोंधे, नितीन इंगवले, नवनाथ ढवळे, रामदास कस्पटे, नेहल कुदळे, विकास कस्पटे, विक्रम कलाटे, अक्षय कळमकर, जगन्नाथ कस्पटे, मुकेश कस्पटे, श्रीनिवास मानकर, आकाश बोडके, किशोर कस्पटे, बाळासाहेब कस्पटे, बाळासाहेब जाधव, हिरामण कस्पटे, किशोर कस्पटे, निलेख वाघमारे आदी उपस्थित होते.

या महोत्सवात विविध क्षेत्रातील नामांकित खाजगी कंपन्याचा सहभाग होता. कोरोना व लॉकडाऊमुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. संसाराचा गाडा चालवताना अनेक कुटुंबांची दमछाक होत आहे. त्यामुळे या नोकरी महोत्सवातून चांगली नोकरी लागावी, बेरोजगारी नाहीशी होऊन स्वतःला व आपल्या कुटुंबाला सावरता यावे, यासाठी आयोजन केले होते. हा उद्देश सफल झाल्याचे नगरसेवक संदिप कस्पटे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचा प्रास्ताविक संदिप कस्पटे यांनी केले. जॉब शोकेसच्या संचालिका तास्मिया शेख आणि त्यांच्या टीमने संयोजन केले. संदिप जगताप यांनी सूत्रसंचालन केले.

Share this to: