सावधान.. रस्त्यावरचे तळलेले वडा पाव, भजी खाताय, तर मग तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो हा भयानक परिणाम..!

पुणे, दि.१५ (पिंपरी चिंचवड टाइम्स)  – रस्त्यावरचे चटकदार, चमचमीत पदार्थ पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटतेच.. तुम्हालाही असा मोह होत असेल, तर मनाला आवर घाला.. कारण हे पदार्थ खाऊन तुम्ही स्वत:च आजारांना निमंत्रण देत आहात..

कारण, रस्त्यावर विकले जाणारे वडा पाव असो की भजी.. ती तळण्यासाठी खाद्यतेलाचा पुन्हा पुन्हा वापर केला जातो, जो आरोग्यासाठी अपायकारक असतो. हॉटेलचालकांनी असे केल्यास अन्न व औषध प्रशासनातर्फे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते..

सर्व प्रकारचे धातू किंवा मिश्र धातूंचा उपयोग करून भांडी बनविली जातात, पण सगळेच धातू अन्न शिजविण्यासाठी सुरक्षित असतीलच असे नाही. त्यामुळे अन्न शिजविण्यासाठी सर्वसामान्यपणे वापरली जाणारी स्टेनलेस स्टीलची भांडीच सर्वोत्तम समजली जातात. कारण, विविध धातूंच्या मिश्रणाने ती बनवलेली असतात.

हाॅटेलमध्ये जर रोज ५० लिटरपेक्षा अधिक तेलाचा वापर होत असेल, तर हॉटेलचालकांनी दररोजच्या साठ्याची नोंद ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, कुठेही या नियमाचे गांभीर्याने पालन होताना दिसत नाही. सूर्यफुल, कॉर्न ऑइल किंवा इतर कुठलेही खाद्यतेल परत परत गरम केल्यास त्यात ‘अलडीहाइड्स’ नावाचे विषारी पदार्थ तयार होताे. तो वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देतात. उदा. हृदयविकार, कर्करोग, अल्झायमर, डिमेन्शिया, पार्किन्सन्स आदी.

परत परत तळल्या जाणाऱ्या तेलातून अनेक पदार्थ बाहेर निघतात, त्याला ‘फोअर हैद्रॉक्सी ट्रान्स नॉमिनल’ म्हणतात. त्याचा परिणाम ‘डीएनए’ आणि ‘आरएमए’ यांच्यावर होऊ शकतो. तेल परत परत तळत असल्यामुळे त्यातील रासायनिक घटक बदलतात. त्याच्या चवीवरदेखील परिणाम होऊ लागतो. ट्रान्स फॅट्सचे प्रमाण वाढते. त्यामुळे रक्तातील ‘एलडीएल’ नावाचे वाईट कोलेस्ट्रॉलदेखील वाढू शकते, असे आहारतज्ज्ञ अर्चना रायरीकर यांनी सांगितले..

तळलेल्या तेलाचे काय करायचे..?

वापरलेले तेल बायोडिझेल कंपन्यांना दिल्यास त्याचे पैसे मिळतात. मात्र, त्याचा दर कमी असताे. प्रत्येक कंपनीचे दर वेगवेगळे असतात. साधारणपणे बायोडिझेल कंपन्या या हॉटेलचालकांना लिटरमागे ८ ते १० रुपये देत असल्याचे पुण्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाचे नोडल अधिकारी अरुण भुजबळ यांनी सांगितले.

Share this to: