चिखलीमध्ये नेताजी काशिद यांनी शिवसेनेचे उपनेते सचिन आहिर यांच्या उपस्थितीत महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले

चिखली, दि. १६ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – शिवसेनेचे उपनेते व संपर्कप्रमुख सचिन आहिर यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. त्याअंतर्गत सचिन आहिर यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उपशहरप्रमुख नेताजी काशिद यांच्या चिखली येथील कार्यालयाला भेट दिली. नेताजी काशिद, जयमाऊली महिला बचत गटाच्या अध्यक्षा साधना काशिद व शिवसैनिकांनी सचिन आहिर यांचे जोरदार स्वागत केले. सचिन आहिर यांच्या उपस्थितीत नेताजी काशिद यांनी आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उपशहरप्रमुख नेताजी काशिद हे चिखली भागातील एक वजनदार राजकीय नेते म्हणून ओळखले जातात. नेताजी काशिद यांचा या भागात दांडगा जनसंपर्क आहे. सर्व स्तरातील नागरिकांसोबत त्यांचा चांगला संवाद आहे. जनतेच्या पाठबळामुळे नेताजी काशिद यांनी आगामी महापालिका निवडणुकीत चिखलीतील मैदान मारण्याचा चंग बांधला आहे. नेताजी काशिद यांच्या माध्यमातून चिखली भागात प्रथमच शिवसेनेच्या धनुष्यबाणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपनेते व संपर्कप्रमुख सचिन आहिर हे पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर होते. त्यांनी उपशहरप्रमुख नेताजी काशिद यांच्या चिखलीतील कार्यालयाला भेट दिली. यावेळी नेताजी काशिद व त्यांच्या पत्नी तसेच जयमाऊली महिला बचत गटाच्या अध्यक्षा साधना काशिद आणि शिवसैनिकांनी सचिन आहिर यांचे जोरदार स्वागत केले. या स्वागतामध्ये चिखली भागातील नागरिकही स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. यावेळी नेताजी काशिद यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात दीड हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन सचिन आहिर यांना दिले. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले, नगरसेवक राहुल कलाटे, युवराज कोकाटे, संजय गाढवे, सूर्यकांत देशमुख, अनंत मते, हरिभाऊ लोकरे, सुखदेव देवकर, अशोक गायकवाड, विजय शिवपुजे, भागवत शेळके, बापू कापसे, रमेश सांगडे, गणेश अवचिते, डोळ मामा आदी उपस्थित होते.

Share this to: