लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघड

भोसरी. दि.३० (पिंपरी चिंचवड टाइम्स) – लग्नाचे अमिष दाखवून १९ वर्षीय तरुणाने १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जून ते २९ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत एमआयडीसी भोसरी परिसरात घडली.

कैलास शहाजी पाटोळे (वय १९, रा. एमआयडीसी भोसरी) याला पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या १५ वर्षीय मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधली. आरोपीने त्याच्या दुचाकीवरून नेऊन पीडित मुलीला त्याच्या घरी आणि एच ए कॉलनीच्या पाठीमागील गेटजवळ खोलीत नेऊन तिच्यावर वेळोवेळी जबरदस्तीने बलात्कार केला. पीडित मुलगी यामुळे गरोदर राहिली. हा प्रकार कुटुंबियांच्या निदर्शनास येताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share this to: