चिखलीतील टाळ मंदिराच्या सीमाभिंतीच्या कामाचे महापौरांच्या हस्ते भूमीपूजन

भोसरी, दि. १७ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – चिखली येथील टाळ मंदिराच्या सीमाभींतीचे आणि जाधववाडी येथील गणेश मंदिराच्या उभारणीचे भूमीपुजन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रभाग क्रमांक २ मधील चिखली येथील टाळमंदिरा भोवती सीमाभींत बांधण्यात येणार आहे. तसेच जाधववाडी येथे गणेश मंदिर उभारण्यात येणार आहे.

यावेळी जाधववाडी येथील शुभाष मित्र मंडळाचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Share this to: