खासदार अमोल कोल्हे यांनी तळवडे-रुपीनगर प्रभागातील रस्त्यांसाठी दिला खासदार निधी; शुक्रवारी त्यांच्या हस्ते होणार कामांचे भूमीपूजन

भोसरी, दि. २८ (पिंपरी चिंचवड टाइम्स) –  शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते खासदार निधीतून तळवडे-रुपीनगर प्रभागात विविध विकासकामे केली जाणार आहेत. या विकासकामांचे खासदार कोल्हे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. २९) भूमीपूजन होणार आहे. तळवडे-रूपीनगर प्रभागात खासदार निधीतून कामे व्हावीत यासाठी शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर यांनी पाठपुरावा केला होता.

तळवडे-रुपीनगर प्रभागातील नवीन रस्त्याच्या विकास कामासंदर्भात शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत खासदार कोल्हे यांनी तेथील विविध रस्त्यांच्या विकासासाठी खासदार निधी मंजूर करून घेतला आहे. या विकासकामांचे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता खासदार कोल्हे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात येणार आहे.

यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक अजित गव्हाणे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रभागातील नागरिकांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर यांनी केले आहे.

Share this to: