लग्नाच्या अमिषाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार

दिघी, दि.१७ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – लग्नाचे अमिष दाखवत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार १५ ऑक्टोबर २०२१ ते १६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत वाघेश्वर शाळेच्यासमोर च-होली व हडपसर येथे घडला.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने शनिवारी (दि. १६) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरविंद सोनवणे (वय २०, रा. हडपसर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना १३ वर्षीय मुलगी आहे. आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीला लग्नाचे अमिष दाखविले आणि फूस लावून दुचाकीवरून च-होली येथून आरोपीने त्याच्या हडपसर येथे घरी नेले. मुलगी अल्पवयीन आहे, हे माहिती असताना देखील आरोपीने मुलीबरोबर जबरदस्तीने बलात्कार केला.

याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम ३६६ अ, ३७६, सह पॉक्सो कायदा कलम ४, ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Share this to: