एनआरआय असलेल्या या व्यक्तीसोबत ड्रामा क्वीन राखी सावंतने बांधली लग्नगाठ

मुंबई, दि. ५ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – ड्रामा क्वीन राखी सावंतचे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तिने लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलए होते. अखेर राखीनेच मी लग्न केले नसल्याचे स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला होता. पण आपल्या एका विधानावर ठाम राहील ती राखी कसली. राखीचे पुन्हा नववधुच्या वेषातील फोटो समोर आल्यानंतर तिने स्वतः लग्न केले असल्याची कबुली दिली आहे. मोजक्याच नातेवाईंकाच्या उपस्थितीत राखीने एनआरआय मुलासोबत लग्नगाठ बांधली आहे.

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत राखीने तिच्या लग्नाचे वृत्त खरे असल्याचे सांगितले. ‘होय मी खरंच लग्न केले आहे, मी लग्न केले हे सगळ्यांपासून लपवले कारण मी घाबरली होती. माझ्या पतीचे नाव रितेश आहे आणि ते लंडनला असतात. लग्न झाल्यानंतर ते लगेच लंडनला रवाना झाले. मात्र माझ्या व्हिसाचे काम अपूर्ण असल्याने मी काही दिवसांनंतर त्यांच्याकडे जाणार आहे, असे राखीने सांगितले आहे.

माझी एक मुलाखत पाहून रितेशने मला व्हॉट्सअॅप मेसेज केला होता. त्यानंतर आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो. नंतर आमच्यात मैत्री झाली. आमची मैत्री झाल्यानंतर मी नेहमी देवाकडे मला यांच्यासारखाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करायचे आणि देवाने माझी ती इच्छा पूर्ण केली. आम्ही मोजक्याच नातेवाईंकाच्या उपस्थितीत लग्न केले, असा खुलासा राखी सावंतन केला आहे.

Share this to: