वाकडमधील आरक्षणांच्या विकासकामांचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते भूमीपूजन

चिंचवड, दि. ३ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक २६ वाकड-पिंपळेनिलखमध्ये विविध आरक्षणे विकसित करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते शनिवारी (दि. ३) करण्यात आले.

महापौर राहुल जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी स्थायी समितीच्या माजी सभापती व नगरसेविका ममता गायकवाड, आरती चोंधे,  माजी नगरसेवक विनायक गायकवाड, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, कार्यकारी अभियंता सुनिल वाघुंडे, देवण्णा गट्टुवार, बाबासाहेब गलबले, उपअभियंता माधव सोनवणे, चंद्रकांत मोरे यांच्यासह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.

वाकड वेणूनगर येथील लिनियर गार्डन हे दोन्ही रस्त्यांमध्ये विकसीत करण्यात येणार आहे. त्यामध्ये एंन्ट्रन्स प्लाझा, स्कल्पचर, स्क्रिन वॉल, सिटींग एरिया, अँक्टीवीटी एरिया, किड्स प्ले एरिया, सेंट्रल पाथवे, फ्लॉवर शर्बबेड, जंक्शन, उभारले जाणार आहे. या कामासाठी १ कोटी ६६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. 

कावेरीनगर पोलिस लाईनमधील दोन खेळाच्या मैदानांमध्ये कबड्डीचे मैदान, कुस्ती हौद, कुस्ती मॅटिंग, जाँगिग ट्रॅक, फुटबॉलसाठी पिच, चेंजींग रुमसह स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे. या कामासाठी १ कोटी ७९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांचा वाकड-पिंपळेनिलख परिसरातील नागरिकांना लाभ होणार आहे.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले  यांनी केले. 

Share this to: