पिंपळेगुरवमधील दिव्यांग महिला जलतरणपटूला महापालिकेकडून दोन लाखांची आर्थिक मदत

पिंपरी, दि. ३ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – अबुधाबी येथे झालेल्या पॅरॉलिंपिक जलतरण स्पर्धेत रजत व कास्य पदक पटकावणारी पिंपळेगुरव येथील दिव्यांग जलतरणपटू केमिला पटनायक हिला पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून दोन लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. या मदतीचा धनादेश महापौर राहुल जाधव आणि क्रीडा समिती सभापती तुषार हिंगे यांच्या हस्ते केमिला हिला देण्यात आला.

केमिला हिला महापालिकेकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी भाजयुमोचे राहुल शिंदे आणि मिथुन कुमार यांनी प्रयत्न केले. तिला महापालिकेचा धनादेश देताना भाजयुमो शहराध्यक्ष व नगरसेवक रवि लांडगे, प्रभाग स्वीकृत सदस्य वैशाली खाडये, दिपक नागरगोजे, अजित कुलथे, प्रविण सिंग, धनंजय शाळिग्राम, योगेश सोनवणे, गणेश जवळकर, अमित गुप्ता, सचिन ढवळे, नागनाथ गुट्टे, दीपक शर्मा आदी उपस्थित होते.

Share this to: