पाऊस लांबल्याने पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, महापौरांची बैठक

पालिकेतील पक्षनेत्यांची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीला महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते

पुणे : खडकवासला धरणामधील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने पालिकेने दहा टक्के पाणी कपात सुरू केली आहे. दररोजच्या पाणी पुरवठ्यामधून ही कपात सुरु असून आवश्यकता भासल्यास एक दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागेल असे सूतोवाच पालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये केले. त्यामुळे आगामी काळात पुणेकरांना पाणी कपातीला तोंड द्यावे लागेल अशी चिन्हे आहेत.

पालिकेतील पक्षनेत्यांची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीला महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, सेनेचे गटनेते संजय भोसले, आरपीआयच्या सुनिता वाडेकर, मनसेचे वसंत मोरे, एमआयएमच्या अश्विनी लांडगे यांच्यासह आयुक्त सौरभ राव व पालिकेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शहरातील पाणी पुरवठ्यामध्ये कपात सुरु करण्यात आली आहे असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा दहा टक्के पाणी कपात सुरु करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली.

Share this to:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *