मावळ तालुक्यात रविवार ३० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

मावळ, दि.२ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – आज रविवार (दि.२) मावळ तालुक्यात कामशेत, माळवाडी, तळेगाव दाभाडे ग्रामीण, वराळे, सुदुंबरे, बधलवाडी, आढले बु, तळेगाव नगर परिषद, लोणावळा नगर परिषद, वडगाव नगर पंचायत, शहरी भागातील , ग्रामीण भागातील असे एकूण ३० जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी माहिती दिली.

कामशेत-२, माळवाडी-१, तळेगाव दाभाडे ग्रामीण -२, वराळे- १, सुदुंबरे-१, बधलवाडी-१, आढले बु- १, तळेगाव नगर परिषद -१९, लोणावळा नगर परिषद-१, वडगाव नगर पंचायत-१, शहरी भागातील २१, ग्रामीण भागातील ९ असे एकूण ३० कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

आज मिळालेल्या मावळ तालुका कोरोना अहवालानुसार, आत्तापर्यंत एकुण ८०८ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत तर ३७० रुग्णांना घरी सोडले असून आजपर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Share this to: