कोरोनामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये आतापर्यंत ४४७ जणांचा मृत्यू, त्यात ३५५ पिंपरी-चिंचवडकरांचा समावेश; रविवारी ८७१ जणांना कोरोना, ७९७ रुग्ण कोरोनामुक्त

पिंपरी, दि. २ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी (दि. २) ८७१ नवीन रुग्ण आढळले आहेत. आज ७९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील ८ जणांचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे. त्यातील दोन जण हे शहराबाहेरील आहेत.

आज ८७१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २२ हजार ९३४ झाली आहे. आज ७९७ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत शहरातील १५ हजार ४७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे पिंपरी-चिंचवडमधील ३५५ जणांचा आणि शहराबाहेरील ९२ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत एकूण ३ हजार ७०४ कोरोना रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

Share this to: