मावळातील साते येथे स्व.भगवान नामदेव मोहिते यांच्या स्मरणार्थ हनुमान मंदिर प्रवेशद्वाराचे लोकार्पण

मावळ, दि.२ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – मावळातील मोहितेवाडी साते येथील स्व.भगवान नामदेव मोहिते स्मरणार्थ आज श्री संकट मोचन हनुमान मंदिर प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

साते ग्रामपंचायतचे सरपंच विठ्ठल भगवान मोहिते यांनी स्वखर्चातुन मुख्य रस्त्यावर कमान ऊभारली आहे. या कमानीचे उद्घाघाटन साते, मोहितेवाडी, ब्राम्हणवाडी, विनोदेवाडी येथील सर्व ग्रामस्थांच्या आणि नेते मंडळींच्या उपस्थितीत पार पडला

यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, सभापती कृषी व पशुसंवर्सधन बाबुराव वायकर, अध्यक्ष राँ.काँग्रेस मावळ बबनराव भेगडे, व्हा.चेअरमन सं सा.कारखाना बापुसाहेब भेगडे, सुभाषराव जाधव, तुकाराम बुवा ढोरे, भाऊसाहेब नवलाखा आदी उपस्थित होते.

सभापती कृषी वपशुसंर्धन जिल्हा परिषद पुणे बाबुराव(आप्पा)वायकर यांच्या फंडातुन मुंबई पुणे हायवे ते मोहितेवाडी गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पथदिव्यांचे उद्घाटन देखील करण्यात आले.

Share this to: