केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण; स्वतः ट्विट करून दिली माहिती

दिल्ली, दि.२ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित शहा यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे अमित शहा यांनी सांगितलंय.

अमित शहा यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहिती दिली आहे. अमित शहा एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.

कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसत असल्याने आपण चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होत आहोत, असे ट्विट अमित शहांनी केलंय.

माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:चं विलगीकरण करावे आणि आपली चाचणी करुन घ्यावी, असंही अमित शहा यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे.

Share this to: