आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शरदाताई टोपे यांच निधन

मुंबई, दि.१ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांचे प्रदिर्घ आजाराने निधन झाले आहे. त्या ७४ वर्षांच्या होत्या त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

जालन्यातील अंबड तालुक्यातील कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना येथे उद्या सायंकाळी ०४:०० वाजता अंत्यसंस्कार होणार आहे.

त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई सून, नातवंडे असा परिवार आहे. कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे.(मर्यादित उपस्थितीची) त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले .

कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसांची सुरुवात ते करायचे. ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. चार वर्षापूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आशीर्वाद दिले.तो आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहिल, अशी भावना मंत्री टोपे यांनी व्यक्त केली.

Share this to: