मावळातील तळेगाव शहरातील साक्षी परदेशी हि विद्यार्थीनी बारावीत अव्वल

तळेगाव, दि.१ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – मावळातील तळेगाव दाभाडे येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या साक्षी सुनिल परदेशी या विद्यार्थीनी ने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. तिने मराठी माध्यमातून बारावीची परीक्षा देत ८५.२३ टक्के गुण मिळविले. यामुळे तळेगाव शहराची मान अभिमानाने उंचावली आहे.

वडिल सुनिल भागीरथ परदेशी आई शोभा सुनिल परदेशी यांना मुलीच्या या यशाचा अंत्यंत अभिमान वाटत आहे. साक्षी सुनिल परदेशी हि विद्यार्थी तळेगाव शहरात राहणारी तिची आई भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या सरचटणिस आहेत.तीने पहिली ते दहावीपर्यंत तळेगाव येथील सरस्वती विद्यामंदिर येथे शिक्षण घेतले. नंतर आकरावी ते बारावी तळेगाव येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतले.

आई वडिलांचे मार्गदर्शन आणि आशीर्वादाने तिने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. ८५.२३ टक्के गुण मिळवून पंचक्रोशीत अव्वल येण्याचा बहुमान मिळवला आहे.

साक्षीला पुढे B.A करायच आहे. आहे. पैलवान विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने तिचा सत्कर करण्यात आला.

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळा भेगडे, भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे,नगरसेवक अरूण भेगडे, मंगेश संरोदे,आशुतोष हेंद्रे , सुनील भेगडे, संदीप वाळुंज इतर मान्यवर उपस्थित होते

Share this to: