पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी एकाच दिवशी तब्बल २ हजार १७० जण कोरोनामुक्त, ८७० जणांना कोरोना, १८ जणांचा मृत्यू

पिंपरी, दि. १ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी (दि. १) ८७० नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच कोरोना झालेल्या शहराबाहेरील ३३ नागरिकांना आज उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले आहे. आज एकाच दिवशी तब्बल २ हजार १७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील चार जण हे शहराबाहेरील आहेत.

आज ८७० जणांना कोरोनाची बाधा झाल्याने शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २२ हजार ६३ झाली आहे. आज २ हजार १७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरातील १४ हजार ६८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे पिंपरी-चिंचवडमधील ३४९ जणांचा आणि शहराबाहेरील ९० जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत एकूण ३ हजार ५५३ कोरोना रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

Share this to: