राजू शेट्टी हे सरकारी आंदोलक

मुंबई, दि.१ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – राजू शेट्टी लुटूपुटूची लढाई करत आहेत. ते सरकारमध्ये आहेत. त्यामुळे ही फक्त सरकार वाचवण्यासाठीची लढाई आहे. राजू शेट्टी सरकारी आंदोलक झाले आहेत,असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावर केला आहे.

फडणवीस म्हणाले, या अडचणीच्या काळात दूध उत्पादक शेतकरी हा दुधाच्या उत्पन्नावर जगतो आहे. ज्यावेळी दुधाचे दर कमी होतात त्यावेळी दर स्थिर करण्यासाठी सरकार अनुदान देतं. सध्या शेतकऱ्यांच्या दुधाला मिळणाऱ्या दरात गाईच्या चाऱ्याचा खर्चही निघत नाही. असे असतानाही सरकारकडून कुठलेही अनुदान मिळत नाही हे दुर्दैवी आहे.

बाळासाहेब थोरात यांची माहिती चुकीची आहे. देशात एक ग्रामही दुधाची भुकटी आयात झालेली नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

Share this to: