लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वडगांवमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते वृक्षारोपण

वडगाव , दि.१ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्ताने प्रदेश भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी वडगाव मावळ येथील भाजपा कार्यालयात येऊन अभिवादन केले.यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पुणे जिल्हा प्रभारी योगेश गोगावले, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रविंद्र अनासपुरे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे, जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, शामराव राक्षे, किरण भिलारे,भूषण मुथा, सुनील चव्हाण, विकास लिंबोरे, सचिन भांडे,महिला अध्यक्ष सायली बोत्रे,लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव,सुमित्रा जाधव,सुजाता मेहता,योगिता कोकरे, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this to: