नाचता येईना म्हणे अंगण वाकडे – चंद्रकांत पाटील

मावळ, दि.१ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – भाजपच्या वतीने मावळ तालुक्यातील नायगाव येथील पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या नायगाव शीतकरण केंद्रावर शनिवारी राज्यव्यापी महाएल्गार आंदोलन होत आहे. अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटिल म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकरी नसले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकरी आहेत, त्यांनी तरी शेतकऱ्यांना भावना समजून शेतकरी हिताच्या निर्णयाला प्राधान्य दिले पाहिजे

शासनाने शेतकऱ्यांकडे सपशेल दुर्लक्ष केले.दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. मुख्यमंत्री म्हणतात, मला शेतीतले काही कळत नाही. पण रात्री १ वाजेपर्यंत पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी जसे लक्ष घालता तसे लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घाला. ‘नाचता येईना म्हणे अंगण वाकडे, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

दरम्यान, सध्या कोरोनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था विस्कटलेली आहे. दूधधंदा हाच शेतकऱ्यांचा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे सरकारने दुधाला प्रति १० रूपये भुकटीला ५० रुपये अनुदान दिले पाहिजे, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला केलंय

Share this to: