मावळ तालुक्यातील मंदिरांमध्ये, घराघरांत दिपोत्सव करून राम मंदिर भूमीपूजनाच्या सुवर्ण दिनाचे साक्षीदार व्हा – माजी राज्यमंत्री बाळा भेगडे

मावळ, दि.१ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – आयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर निर्माणाचे ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भूमीपूजन करण्यात येणार आहे. या सुवर्ण दिनाचे साक्षीदार होण्यासाठी पुणे जिल्ह्यात, मावळ तालुक्यातील मंदिरांमध्ये आणि घराघरांत दिवाळीसारखे दिपोत्सव करावे, असे आवाहन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केले आहे.

राम मंदिर भूमीपूजनाचा दिवस देशासाठी सुवर्ण दिन आहे. या सुवर्ण दिनाची वाट संपूर्ण देश पाहत होता. तो दिवस आता जवळ आला आहे. येत्या ५ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर निर्माणाला सुरुवात होणार आहे.

यादिवशी मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांनी तालुक्यातील मंदिरांमध्ये व आपआपल्या घरांमध्ये दिपावली प्रमाणे दिपोत्सव साजरा करून या सुवर्ण दिनाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन बाळा भेगडे यांनी केले आहे.

Share this to: