वडगावातील मंदिरांमध्ये, घराघरांत दिपोत्सव करून राम मंदिर भूमीपूजनाच्या सुवर्ण दिनाचे साक्षीदार व्हा – मुख्यविश्वस्त सोपानराव म्हाळसकर

वडगाव, दि.१ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – आयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर निर्माणाचे ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भूमीपूजन करण्यात येणार आहे. या सुवर्ण दिनाचे साक्षीदार होण्यासाठी वडगावातील मंदिरांमध्ये आणि घराघरांत दिवाळीसारखे दिपोत्सव करावे, असे आवाहन श्री पोटोबा, महादेव, मारुती, दत्त देवस्थान संस्थानचे मुख्यविश्वस्त सोपानराव बाबुराव म्हाळसकर , विश्वस्त सचिव अनंता कुडे यांनी केले आहे.

राम मंदिर भूमीपूजनाचा दिवस देशासाठी सुवर्ण दिन आहे. या सुवर्ण दिनाची वाट संपूर्ण देश पाहत होता. तो दिवस आता जवळ आला आहे. येत्या ५ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर निर्माणाला सुरुवात होणार आहे.

यादिवशी वडगावमधील सर्व नागरिकांनी शहरातील मंदिरांमध्ये व आपआपल्या घरांमध्ये दिपावली प्रमाणे दिपोत्सव साजरा करून या सुवर्ण दिनाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन श्री पोटोबा, महादेव, मारुती, दत्त देवस्थान संस्थान चे मुख्यविश्वस्त सोपानराव बाबुराव म्हाळसकर , विश्वस्त सचिव अनंता कुडे यांनी केले आहे.

Share this to: