सध्याचं सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका – राम शिंदे

अहमदनगर, दि.१ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – महाराष्ट्रातील तिगडी सरकारविरोधात आजचं आंदोलन करण्यात आले आहे. सरकारनं सत्तेत आल्यापासून कुठलाही निर्णय घेतला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता अडचणीत आली आहे. त्यामुळे सरकारचे कान उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आल्याचं राम शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

सध्याचं सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यातून अडचणीत आलेला संसार आहे, अशी बोचरी टीका भाजप नेते राम शिंदे यांनी केली आहे. सोलापूर-नगर महामार्गावर दूध दरवाढीसाठीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

घरातला कर्ता माणूसच कोपर्‍यात जाऊन बसला आहे. नागरिक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आहेत. आमच्या सरकारमध्ये आम्ही शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचे ठरवले होते. मात्र या सरकारने अनुदानच दिलेले नाही, कोरोनाच्या काळात नागरिकांना कसलाच मदतीचा हात सरकारनं दिलेला नाही. फक्त केंद्र सरकारकडेच बोट दाखवायचं काम राज्य सरकार करत असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं आहे.

Share this to: