भाजपचे ४० आमदार आमच्या संपर्कात आहेत राज्यमंत्री बच्चू कडू यांचा दावा

मुंबई, दि.१ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – महाविकास आघाडी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये आहे. यांच्यात विसंवाद आहे, लवकरच हे सरकार कोसळेल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला असतानाच भाजपचे ४० आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. तीन पक्षांचं सरकार अगदी व्यवस्थित चालू आहे. जनतेच्या भल्याचे निर्णय आम्ही घेत आहोत. त्यामुळे आमचे सरकार अस्थिर असण्याचा प्रश्नच नाही. याउलट विरोधी पक्षचं अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे तसंच ४० आमदारांची यादी तयार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.

तीन पक्षांच्या सरकारमध्ये ताळमेळ दिसत नाही तसंच महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होत नाही. यांच्यामध्ये प्रचंड अंर्तविरोध आहे. त्यामुळे सरकार पाडायची गरज नसून मनानेच हे सरकार कोसळणार आहे, असे भाजपचे नेते वारंवार सांगत आहे. तर सरकारला कोणताही धोका नाही, असं सत्ताधारी पक्षाचे नेते सांगत आहे.

आमचं महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्ष टिकणार म्हणजे टिकणारच, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

Share this to: