पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाची साखळी कायम; शुक्रवारी नवीन ८७६ रुग्ण, १३० कोरोनामुक्त तर १२ जणांचा मृत्यू

पिंपरी, दि. ३१ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाची साखळी कायम आहे. शुक्रवारी (दि. ३१) ८७६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच कोरोना झालेल्या शहराबाहेरील ३७ नागरिकांना आज उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले आहे. आज १३० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, शहरातील १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील जार जण हे शहराबाहेरील आहेत.

आज ८७६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २१ हजार १९३ झाली आहे. आज १३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरातील १२ हजार ५७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे पिंपरी-चिंचवडमधील ३३५ जणांचा आणि शहराबाहेरील ८६ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत एकूण ३ हजार ५२७ कोरोना रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

Share this to: