फडणवीस हे लग्नासाठी उतावीळ झाले आहेत;मात्र त्यांना नवरीच मिळेना – प्रकाश आंबेडकर

औरंगाबाद, दि.३१ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडून पुन्हा भाजपाचे सरकार आणण्याचा प्रयत्न राज्यात सुरु आहे का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी विचारला.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लग्नासाठी उतावीळ झाले आहेत. मात्र त्यांना नवरीच मिळेना अशी त्यांची अवस्था झाली आहे अशी खोचक टीका केली.

प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा लॉकडाउनला विरोध करणारी भूमिका मांडली. पाच टक्के लोकांसाठी ९५ टक्के लोकांना वेठीला धरणं चुकीचं आहे. लोकांनी लॉकडाउनचे नियम तोडून आपले व्यवहार सुरळीत करावेत अशी भूमिकाही प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा मांडली. प्रकाश आंबेडकर यांनी परवाच अकोल्यात न्हाव्याकडे जाऊन केस कापून घेतले आणि लॉकडाउनला विरोध दर्शवला. लॉकडाउन असाच कायम राहिला तर करोनापेक्षा लोक उपासमारीने मरतील असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. लॉकडाउनचा सगळ्यात मोठा फटका हा कामगार आणि पारंपारिक व्यापाऱ्यांना बसला आहे त्यांना सरकारने मदत केली पाहिजे अशीही मागणी त्यांनी आज केली.

Share this to: